
राजकोट सुशोभिकरणाचे ठेकेदार उबाठाचे पदाधिकारी.
मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजकोट किल्ल्यावरील पुतळा पडल्याचे विरोधकांच्या होणार्या टीकेचा मंत्री उदय सामंत यांनी समाचार घेतला. काणत्या गोष्टीवर किती काळ राजकारण करावे, हे विरोधकांना समजायला हवे. मालवण येथील स्थानिक लोकप्रतिनिधीने राजकोट किल्ल्याच्या सुशोभिकरणाचे ठेकेदार उबाठाचे पदाधिकारी असल्याचे उघड केले. त्यामुळे महाराजांचा पुतळा उबाठाच्या पदाधिकार्यांमुळे पडला असे आम्ही म्हणायचे का, असा सवाल मंत्री सामंत यांनी केला. www.konkantoday.com