
रेंगाळलेल्या चिपळूण-कराड लोहमार्गाच्या मागणीसाठी दुचाकीस्वारांची निघणार रॅली.
राज्याचे भूतपूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चिपळूण-कराड रेल्वे संदर्भात सकारात्मक भूमिका घेत या मार्गासाठी मंजूरी घेतली. पुढे हे काम होवू शकले नाही. पण, आता सर्वपक्षीय व जनमताचा दबाव गट निर्माण करण्याची गरज असल्याचे मत कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भरतशेठ लब्धे यांनी व्यक्त केले आहे. यासाठी पहिला प्रयत्न चिपळूण ते कराड बाईक रॅली काढण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.www.konkantoday.com