हिंदू आणि मुस्लिम समाजाला इथले प्रशासन वेगवेगळे नियम लावते -आ. नितेश राणे.
रत्नागिरीमध्ये हिंदू समाज राहतो याचा प्रशासनाला विसर पडला आहे.हिंदू आणि मुस्लिम समाजाला इथले प्रशासन वेगवेगळे नियम लावते आहे. अनधिकृत बांधकामबाबत आजपर्यंत अनेक निवेदने, मोर्चा आणि आंदोलन करण्यात आली आहेत. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. परंतु आता प्रशासनाकडून आम्हाला ही बांधकाम हटवण्याची तारीख हवी आहे, जर यावेळी ही प्रशासन गंभीर झालं नाही तर मात्र रत्नागिरीतील हिंदू समाज तिसरा डोळा उघडेल आणि त्यानंतर होणाऱ्या तांडवाला इथलं प्रशासन जबाबदार असेल असा थेट इशारा भाजपा नेते आ. नितेश राणे यांनी प्रशासनाला दिला आहे. शनिवारी आ. नितेश राणे यांनी रत्नागिरीमध्ये जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग आणि जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची भेट घेतली. या वेळेला विविध प्रश्नांवर त्यांची चर्चा झाली.