
रत्नागिरी शहरातील कर थकविणार्यांच्या ९८ मालमत्ता सील
_घरपट्टी वसुलीसाठी पालिकेच्या वसुली पथकाने कठोर पावले उचलायला सुरूवात केली आहे. कर चुकवेगिरी करणार्या रत्नागिरी शहरातील ९८ मालमत्ता या विभागाने सील केल्या आहेत. तर ७७ नळ जोडण्या तोडल्या आहेत. एकूण १४ कोटी रुपयांची घरपट्टी कर वसुलीपैकी आतापर्यंत ७ कोटी ३५ लाख रुपये वसूल झाले आहेत. आतापर्यंत फक्त ५० टक्केच्यावर कर वसुली गेली आहे. यापुढे पालिकेची कारवाई सुरू राहणार असल्याचे पथकांनी इशारा दिला.रत्नागिरी पालिकेच्या हद्दीमध्ये सुमारे तीस हजार इमलेधारक आहेत. या इमलेधारकांकडून १४ कोटी घरपट्टी वसुली केली जाते. कोरोनाकाळातील थकबाकी धरून यंदा १४ कोटी वर करवसुलीचे उद्दिष्ट पालिकेसमोर आहे. कर वसुलीसाठी पालिकेने इमलेधारकांना सुरूवातीला नोटीसा काढल्या. त्यानंतर रिक्षा फिरवून ध्वनीक्षेपकांवरून सूचना आणि इशारा दिला. तरी अनेक करदान्यांनी घरपट्टी भरलेली नाही. आर्थिक वर्षातील हा अखेरचा महिना संपत आला तरी अजून ५० टक्के घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट पालिकेसमोर आहे. www.konkantoday.com