जलजीवन मिशन प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या १ हजार ४३२ पाणी योजनांपैकी ४०० कामे पूर्ण.
रत्नागिरी- जलजीवन मिशन प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या १ हजार ४३२ पाणी योजनांपैकी ४०० कामे पूर्ण झाली आहेत.दीडशे योजना पूर्ण होण्याच्या मार्गावर असून, ४३२ योजनांचे प्रस्ताव सुधारित करावे लागणार आहेत. कामे पूर्ण करण्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंतची डेडलाईन देण्यात आली आहे. योजनांची कामे पूर्ण झालेल्या ठेकेदारांचे ५६ कोटी ४८ लाख ९९ हजार रुपये शासन देणे असल्यामुळे त्याचा कामांवर परिणाम होत आहे. त्यामुळे थकीत रक्कम लवकर मिळावी, अशी ठेकेदारांनी मागणी केली आहे.