आता सरकारच्या नव्या निर्णयामुळे मोफत तांदूळ मिळणे बंद होणार.

* केंद्र सरकारकडून आता सरकारच्या नव्या निर्णयामुळे मोफत तांदूळ मिळणे बंद होणारदेशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. यातील बहुतांश योजना गरीब आणि गरजू लोकांसाठी आहेत. केंद्र सरकार सर्व रेशन कार्डधारकांना मोफत रेशन योजनेंतर्गत रेशन पुरवते.मात्र आता त्यात मोठा बदल झाला आहे.या आधी सरकारकडून रेशन कार्डधारकांना मोफत तांदूळ देण्यात येत होतं. मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयानुसार मोफत तांदूळ मिळणार नाही. मोफत तांदळाऐवजी आता सरकार इतर 9 जीवनावश्यक गोष्टी देणार आहे.रेशन कार्डवर आता या गोष्टी मिळणारकेंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेअंतर्गत जवळपास 90 कोटी लोकांना मोफत रेशन दिले जाते. यामध्ये लोकांना पूर्वी मोफत तांदूळ दिला जात होता. मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयामुळे मोफत तांदूळ मिळणे बंद होणार आहे. त्याव्यतिरिक्त गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश आहे. लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे लोकांचे जीवनमानही सुधारेल अशी सरकारला आशा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button