वरवेलीची सुकन्या, ग्रिहिथा विचारेने सर केले बाझार्डूजू शिखर
. गुहागर तालुक्यातील वरवेलीची सुकन्या ठाणे रहिवासी, महाराष्ट्राची हिरकणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या १० वर्षीय कु. ग्रिहिथा सचिन विचारे हिने २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११.२० वा. बाझार्डुजू शिखर यशस्वीरित्या सर केले आणि शिखरावर भारतीय ध्वज फडकावला. रशिया आणि अझरबैजान सीमा सुरक्षा दलांकडून मोहिमेची परवानगी मिळाल्यानंतर ग्रिहिथाने २४ ऑगस्ट रोजी तिच्या वडिलांसह, अझरबैजान मधील गिर्यारोहण मोहीम टीम आणि भारताच्या गिर्यारोहण मोहिम टीमसह चढाई सुरू केली आणि २६ ऑगस्ट रोजी ही मोहीम यशस्वी केली.हे शिखर सर करून ग्रिहिथाने केवळ तिची अतुलनीय दृढनिश्चय आणि कौशल्य दाखवले नाही तर माऊंट बाझार्डूजू हे आव्हानात्मक शिखर जिंकणारी सर्वात कमी वयाची भारतीय बनण्याचा इतिहासही रचला आहे. कु. ग्रिहिथा वयाच्या ६ व्या वर्षापासून पर्वतारोहण करत आहे. त्यात तिला अनेक प्रतिष्ठीत पुरस्कार मिळाले आहेत. आणि आतापर्यंत पर्वतारोहण क्षेत्रात ८ इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि १ एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि १ एशिया बुक ऑफ रेकॉर्ड तिच्या नावे आहेत. www.konkantoday.com