
रत्नागिरी शहरानजिकच्या कुर्ली येथे तरुणाची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या
. रत्नागिरी शहरानजिकच्या कुर्ली येथे तरुणाने राहत्या घरी अज्ञात कारणातून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवार 29 ऑगस्ट रोजी दुपारी 12.45 वा. सुमारास उघडकीस आली. बहर नरेंद्र तोडणकर (34,रा. कुर्ली, रत्नागिरी ) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गुरुवारी दुपारी कुर्ली येथील विजपुरवठ्या संबंधी महावितरणचे कर्मचारी बहरच्या घरी गेले होते. तेव्हा घराचा दरवाजा कोणीही उघडत नव्हते. त्यामुळे आजूबाजुच्या शेजार्यांनी बहरच्या छोट्या भावाला जो आई-वडिलांसह नोकरीनिमित्त गुजरातला असतो त्याला फोन केला. त्याने घराचा दरवाजा तोडून पहा असे त्यांना सांगितले. शेजार्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा फोडला असता त्यांना बहर घरातील लोखंडी पाईपला वायरने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.