
मागील १५ वर्षांत रेल्वे अपघातात ४५ हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू
मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवासादरम्यान लोकलमधील गर्दीमुळे अनेक अपघात होतात. त्यामध्ये कुणी जखणी होतं, तर कुणाचा मृत्यू होतोय. या वाढत्या अपघाताची आणि मृत्यूची नोंद मुंबई हायकोर्टानं बुधवारी गंभीर दखल घेतली.मुंबई उपनगरीय रेल्वेमुळे होणाऱ्या अपघाताचा मृत्यूदर हे 38.08 टक्के इतका आहे. हा मृत्यूदर जगातील सर्वाधिक मोठा असल्यानं ती एक लज्जास्पद बाब असल्याचे ताशेरे हायकोर्टानं ओढले. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेकडून मुंबई हायकोर्टात मागील १५ वर्षांत रेल्वे अपघातात ४५ हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. मुंबई उपनगरीय रेल्वेतील प्रवाशांच्या मृत्यूसंदर्भात यतीन जाधव यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यामध्ये कोर्टाने रेल्वेला खडेबोल सुनावले. रेल्वेकडून कोर्टात मागील १५ वर्षांतील महिती देण्यात आली. त्याशिवाय इतर देशांचा मृत्यूतर आणि मुंबईतील मृत्यूदर यावर तुलना करण्यात आली. पण कोर्टाकडून रेल्वेला खडे बोल सुनावण्यात आलेत.