
गुहागर तालुक्यातील आबलोली – खोडदे मार्गावरील पुलाजवळ बुधवारी गोणी मध्ये मृतदेह आढळला
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील आबलोली – खोडदे मार्गावरील पुलाजवळ बुधवारी गोणी मध्ये मृतदेह आढळला आहेहा मृतदेह रत्नागिरी शहरातील भर बाजारपेठेतील गोखले नाक्यावरून बेपत्ता झालेले मुंबईतील प्रसिद्ध सोने – हिरे व्यापारी कीर्ती कोठारी यांचा असावा असा संशय व्यक्त केला जात आहे सोमवारी व्यापारासाठी रत्नागिरी मध्ये आलेले सोने व्यापारी कीर्तिकुमार कोठारी हे त्याचं दिवशी रत्नागिरी शहरातील गोखले नाक्यावरन बेपत्ता झाले हो
त्यांचा वावर अनेक दुकानाच्या सिसिटीव्ही मध्ये दिसून आला आहे
मात्र गोखले नाका येथे आल्यानंतर पुढे त्यांचा मागमूस लागत नव्हता
त्यांची बुधवारी सकाळी बेपत्ता म्हणून तक्रार त्यांच्या मुलाने शहर पोलीस स्थानकात दिली होती
पण घातपात यां दिशेने पोलीस तपास करत असून यां प्रकरणी पोलिसांनी रत्नागिरी शहरातील एक सोने व्यापारी, एक रिक्षा चालक आणि तिसऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले होते
www.konkantoday.com