
सिंधुदुर्गात एसटी बसचा भीषण अपघात,नऊ प्रवासी जखमी
सिंधुदुर्गात एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. प्रवाशांनी भरलेली बस ओहळात कोसळली. वैभववाडी -कुसुर मार्गावर हा अपघात झाला आहे.सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र या घटनेत नऊ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातामध्ये बसचं देखील मोठं नुकसानं झालं आहे.घटनेबाबत अधिक माहिती अशी की, समोरून येणाऱ्या दुचाकीला साईट देताना चालकाचं एसटी बसवरील नियंत्रण सुटलं, त्यानंतर ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या ओव्हळमध्ये कोसळली.