चंपक मैदान, उद्यमनगर येथे ट्रेनी नर्सवर झालेल्या अत्याचाराचे पडसाद ,आरोग्य विभागाच्या सर्व महिला कर्मचार्‍यांनी संताप व्यक्त करीत काम बंद आंदोलन छेडले

* रत्नागिरी शहरात चंपक मैदान, उद्यमनगर येथे ट्रेनी नर्सवर झालेल्या अत्याचाराचे पडसाद रत्नागिरी सर्वसाधारण रुग्णालयासह संपूर्ण जिल्ह्यात उमटत असून आरोग्य विभागाच्या सर्व महिला कर्मचार्‍यांनी संताप व्यक्त करीत काम बंद आंदोलन छेडले आहे. आम्ही २४ तास काम करतो. आमच्या तीन शिफ्ट असतात. त्यामध्ये आम्ही दिवस-रात्र प्रवास करीत असतो. आमच्या आरोग्य क्षेत्रातील एका सहट्रेनी आरोग्यसेविकेवर जर अत्याचार होत असेल तर आम्ही सुरक्षित आहोत का?’, असा जाब त विचारला जात आहे. जिल्ह्यातील आरोग्य कर्मचार्‍यांच्या समन्वय समितीची तातडीने बैठक होवून आरोपीला अटक करेपर्यंत काम बंद आंदोलन छेडत आहोत, असा इशारा येथे उपस्थित असलेल्या आरोग्यसेविकांनी दिला आहे. आज आम्ही सुरक्षित नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले आणि सर्व आरोग्य सेविका व परिचारिका यांनी आपला संताप तीव्र शब्दात व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button