
कापडगाव जवळ कंटेनरने धडक दिल्याने पादचार्याचा मृत्यू
मुंबई गोवा महामार्गावरील कापड गावजवळ रस्त्याने चालत जाणारा नितीन जाणू कांबळे याला कंटेनरने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला याप्रकरणी कंटेनरचालक उत्तम क्षीरसागर राहणार जत सांगली याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कापडगाव येथील राहणारा नितीन हा मुंबई गोवा महामार्गाने रोनित हॉटेल ते कापडगाव
बस स्टॉप असा चालत जात असताना गोव्यातून मुंबईकडे जाणार्या कंटेनरने त्याला धडक दिली त्यामध्ये त्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
www.konkantoday.com