पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या अणूस्कुरा घाटामध्ये आज पहाटे दरड कोसळली, वाहतूक बंद
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे राजापूर येथून पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या अणूस्कुरा घाटामध्ये आज पहाटे दरड कोसळली त्यामुळे मोठ मोठाले दगड रस्त्यावर आले आहेत यामुळे या घाटातील वाहतूक बंद पडली आहे. दरड पडल्याचे कळतच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने जेसीबी व कर्मचारी पाठविण्यात आले असून वाहतूक पूर्ववत सुरू करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.