बदलापूर नंतर अंबरनाथ हादरले! ९ वर्षाच्या चिमुकलीवर रोज २० दिवस अत्याचार!! नराधम संतोष कांबळेला अटक!!!

बदलापूरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या शाळेतच सफाई कामगाराने चार वर्षांच्या दोन चिमुकलींवर अत्याचार केल्याच्या घटनेने महाराष्ट्र हादरला असतानाच अंबरनाथमध्येही अशीच घृणास्पद घटना घडली आहे. अश्लील व्हिडीओ दाखवून एका नऊ वर्षांच्या शाळकरी चिमुरडीवर 35 वर्षांच्या नराधमाने लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी विकृत संतोष कांबळे याला अटक केली आहे.*अल्पवयीन मुलगी अंबरनाथ पश्चिम भागातील एका वस्तीत कुटुंबासह राहते. तर आरोपी संतोष कांबळे पीडितेच्या शेजारी राहणारा असल्याने त्यांची एकमेकांशी ओळख आहे. याच ओळखीचा गैरफायदा घेत लंपट संतोषने चिमुरडीला खाऊचे आमिष दाखवत सार्वजनिक शौचालयात बोलावले. त्यानंतर शौचालयात पीडित मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.*20 दिवस रोज अत्याचार*खळबळजनक बाब म्हणजे हा लैंगिक छळ 1 जुलै ते 20 ऑगस्टपर्यंत दुपारच्या सुमारास सुरू होता. मुलीने नराधम संतोषच्या कृत्याची माहिती घरी देताच कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. यानंतर तातडीने पोलिसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून नराधम संतोषला बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली.*ठार मारण्याची धमकी*20 ऑगस्ट रोजीसुद्धा दुपारी संतोषने शौचालयात नेले. त्यावेळी नराधम संतोष अश्लील व्हिडीओ दाखवून लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करताच मुलीने विरोध केला. तिच्या विरोधानंतर आरोपीने तिला शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. या धमकीला घाबरून मुलीने घडलेली घटना आईला सांगितली. त्यानंतर आईने मुलीला घेऊन अंबरनाथ पोलीस ठाणे गाठले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button