मांडवी किनाऱ्यावर बघता बघता 2तासात 8 ट्रॅक्टर ट्रॉली भरतील इतका कचरा गोळा,अत्याधुनिक बीच साफ सफाई मशीनचीही ट्रायल

श्री समर्थ रामदास स्वामी यांनी म्हटले आहे की, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, यत्न तोचि देव जाणावा. प्रयत्न करा, कार्य करा, यश तुम्हाला नक्की मिळेल. प्रयत्न केल्यास वाळूतून देखील तेल गळू शकते. त्यासाठी सर्वप्रथम स्वतः प्रयत्न करणे गरजेचं आहे.याचं मनाचा श्लोकाचा प्रत्यय आज सकाळी आम्हला आला, दोन दिवसा पूर्वी आपण मांडावी बीच रत्नागिरी महास्वछता अभियान, असा बीच साफ सफाई संकल्प केला होता आवाहन केलं होत.. आज सकाळी सुमारे 125 जण स्वयंस्पुर्थी नें किनाऱ्यावर गोळा झाले आणि साफसफाई ला सुरवात झाली बघता बघता 2तासात 8ट्रकटर ट्रॉली भरतील इतका कचरा गोळा झाला… या मध्ये स्थानिक मांडावी मधील नागरिक, किनाऱ्या वर व्यवसाय करणारे, रत्नागिरी प्रेमी,कारुण्य मरीन स्टाफ, रोट्ररी क्लब रत्नागिरी, लायन्स क्लब रत्नागिरी, अल्ट्राटेक सिमेंट कंपनी स्टाफ, मैत्री ग्रुप स्टाफ,मांडावी पर्यटन संस्था, अश्या संस्था, रत्नागिरी प्रेमी नागरिक यांचा हातभार लागला.या वेळी नगरपरिषद प्रशासन नें jcb, ट्रॅक्टर, माणसं देऊन मोलाचं सहकार्य केलं, सर्वात महत्वाची गोष्ट आज नवीनच अत्याधुनिक बीच साफ सफाई मशीन ची ट्रायल हि झाली आता ते मशीन लवकर मांडवी किनारा नेहमीचं साफ सफाई करताना दिसेल.. या सर्व महास्वच्छता अभियाना मध्ये सहभागी झालेल्या सर्वच्या चहा, नाश्त्याची चोख व्यवस्था हॉटेल सी फॅन नें केली होती. हे सर्व अभियान यशस्वी होण्याकरता मांडवी पर्यटन संस्थे चें अध्यक्ष श्री राजू किर, आणि मैत्री ग्रुप चें सुहास ठाकूरदेसाई यांनी विशेष मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button