
रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे तीन गाड्यांमध्ये धडक, गाड्यांचे नुकसान
रत्नागिरी रेल्वेस्टेशन फाटा येथे तीन गाड्यांमध्ये धडक होवून अपघात झाला. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कुणालाही गंभीर स्वरूपाची दुखापत झाली नाही. अपघातातील इनोव्हा, टेम्पो ट्रॅव्हलर व दुचाकीचे मोठे नुकसान झाले. तसेच काम सुरू असलेल्या या मार्गावर काही काळ वाहतुकीची मोठी कोंडीही झाली होती.स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार २५ मार्च २०२४ रोजी रेल्वेस्टेशन फाटा येथे टेम्पो ट्रॅव्हलर (एमएच ०४ जीपी १६५२) तसेच इनोव्हा कार व दुचाकी यांच्यात जोराची धडक झाली. या अपघातात इनोव्हा कारचे बोनेटही उखडले होते. www.konkantoday.com