
एलईडी मासेमारीच्या विरोधात या महिन्यात अध्यादेश निघणार
रत्नागिरी :एलईडी मासेमारीला कोकणातील पारंपारिक मच्छिमारांनी विरोध केला असून आता त्याची शासनाने गंभीर दखल घेतली असून एलईडी मासेमारीच्या विरोधात केरळच्या धर्तीवर कडक कारवाईसाठी नवीन कायदा बनवण्यात येत असून त्या संबंधिचा अध्यादेश २३ ऑगस्ट रोजी काढला जाणार आहे. पर्यावरणमंत्री रामदास कदम व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांची यासंदर्भात मंत्रालयात मिटींग झाली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. पारंपारिक मच्छिमारांना एलईडीच्या माध्यमातून होत असलेल्या मासेमारीमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. व त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. म्हणून त्यांचेकडून या विषयी शासनाने नवीन कायदा करावा अशी मागणी होत होती.
www.konkantoday.com