
शिवसेनेच्या प्रचारासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर
रत्नागिरी जिल्हय़ातील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई हे आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. आज सकाळी ११वाजता मठ येथे राजापूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार राजन साळवी यांच्या साठी प्रचाराची जाहीर सभा होणार आहे . त्यानंतर दुपारी तीन वाजता चिपळूण बहादूरशेख नाका येथे महायुतीचे उमेदवार सदानंद चव्हाण यांच्यासाठी ते जाहिरसभा घेणार आहेत .यावेळी खासदार विनायक राऊत शिवसेनेचे उपनेते आमदार उदय सामंत संपर्कप्रमुख सुधीर मोरे जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्यासह भाजपचे जिल्हा अध्यक्ष दीपक पटवर्धन ,माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने अधिक जण उपस्थित राहणार आहेत
www.konkantoday.com