मुनव्वरने कोकणी माणसांची माफी मागितली नाही तर या पाकिस्थानप्रेमी मुनव्वरला जिथे दिसेल तिथे त्याला तुडवणार-शिवसेना शिंदे गटाचे नेते समाधान सरवणकर

बिग बॉस हिंदी सीझन 17 चा विजेता आणि स्टँडअप कोमेडियन मुनव्वर फारुकी हा पुन्हा एकदा त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. मुनव्वर फारुकीने यावेळी आपल्या स्टॅंडअप कॉमेडीच्या कार्यक्रमात कोकणी माणसाबद्दल बोलताना अपशब्दाचा प्रयोग केल्यामुळे तो आता अडचणीत येण्याची शक्यता आहे.कारण मनसेकडून मुनव्वर फारुकीच्या वादग्रस्त वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. तसेच भाजप नेते नितेश राणे यांनीदेखील मुनव्वर फारुकीवर निशाणा साधला आहे. याशिवाय शिवसेना शिंदे गटाचे नेते समाधान सरवणकर यांनीदेखील मुनव्वर फारुकीवर निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे मुनव्वरला जो तुडवेल त्याला एक लांखाचे बक्षीस, असं समाधान सरवणकर म्हणाले आहेत. तर या मुनव्वरला लवकरच मनसेचा दणका बसेल, अशी पोस्ट मनसे वृत्तांत अधिकृतकडून फेसबुकवर करण्यात आली आहे.’मुनव्वरने कोकणी माणसांची माफी मागितली नाही तर या पाकिस्थानप्रेमी मुनव्वरला जिथे दिसेल तिथे त्याला तुडवणार. कोकणी माणूस कसा तुडवतो हे याला समजू दे. याला जो तुडवेल त्याला एक लाखांचे बक्षीस. येवो कोकण आपलंच असा, असे म्हणून स्वागत करणाऱ्या कोकणी माणसांबद्दल हे उपरे ही भाषा बोलतात’, अशा तिखट शब्दांतसमाधान सरवणकर यांनी निशाणा साधला आहे.दुसरीकडे भाजप नेते नितेश राणे यांनीदेखील अतिशय तिखट शब्दांत मुनव्वर फारुकीवर निशाणा साधला आहे. ‘हा कोण मुनव्वर फारुकी नावाचा हिरवा साप, त्याची जीभ चांगलीच वळवळायला लागली आहे. त्याला आपल्या स्टँडअप कॉमेडीमध्ये कोकणातील लोकांबद्दल टिंगल उतरण्याची जास्तच खाज असेल तर त्याचा घरचा पत्ता आम्हाला चांगल्याप्रकारे माहिती आहे. त्याला लवकरच मालवणी हिस्का दाखवावा लागेल की, तो त्याची स्टँडअप कॉमेडी मालवणीत करायला लागेल. कोकणी माणासाची अशी टिंगल करत असशील तर तुझ्यासारख्या हिरव्या सापांना पाकिस्तानात पाठवायला आम्हाला वेळ लागणार नाही’, असं नितेश राणे म्हणाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button