मनसेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या गाडीवर शेण फेकलं तसेच बांगड्या आणि नारळ फेकले.
उद्धव ठाकरे यांच्या ठाण्यातील गडकरी रंगायतन इथं होत असलेल्या सभेत राडा झाला आहे. राज ठाकरेंविरोधात केलेल्या विधानामुळं हे प्रकरण पेटलं आहे. यावेळी मनसे आणि एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या कार्यकर्त्यांसोबत हाणामारी केली.यावेळी इथं जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या फेकल्या होत्या. त्यामुळं मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यापार्श्वभूमीवर आजची घटना घडली आहे. यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह राज ठाकरे यांनी देखील आक्रमक प्रतिक्रिया दिली होती. यावेळी उद्धव ठाकरेंची सभा देखील उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला होता.यावेळी मनसेचे पदाधिकारी-कार्यकर्ते शिवसेनेच्या शिंदे गटाचे कार्यकर्ते यांची उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांसोबत जोरदार बाचाबाची आणि हाणामारी झाली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंच्या गाडीवर शेण फेकलं तसेच बांगड्या आणि नारळ फेकले. यावेळी गडकरी रंगायतनबाहेर मोठ्या प्रमाणावर दोन्हीकडील कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळं इथं मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा देखील तैनात करण्यात आला आहे. अजूनही कार्यकर्ते आक्रमक झालेले पहायाला मिळत आहेत.यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मेळावा उधळून लावण्याचा प्रयत्न केला. पण सभागृहात उद्धव ठाकरे दाखल झाले असून त्यांच्या कार्यकर्ता मेळाव्याला सुरुवात झाली आहे. या घटनेबाबत बोलताना मनसेचे सरचिटणीस अविशान जाधव यांनी म्हटलं की, तुम्ही या वादाची सुरुवात केली होती त्याचा शेवट आम्ही करणार आहोत असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता, आम्ही केवळ आमच्या नेत्याच्या आदेशाचं पालन करत आहोत