
परराज्यातील कामगार, नेपाळी खलाशी, कामगार यांची माहिती पोलीस प्रशासनाला मिळावी यासाठी जिल्ह्यातील आंबा बागायतदार, बोट मालकांची बैठक, याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक काय म्हणतात ते पहा
अंबा बागायती पासून मच्छीमार बोटी पर्यंत नेपाळी खलाशी, नेपाळी कामगार मोठ्या प्रमाणावर रत्नागिरी जिल्ह्यात आले आहेत अनेक वेळा हे कामगार तात्पुरत्या स्वरूपात येत असल्याने त्यांची माहिती पोलिसांपर्यंत येत नाहीत परराज्यातून येणारे कामगार यांच्याकडून गुन्हेगारी कृत्य अधिक घडत असल्याचे मागील काही अनुभवांवरून लक्षात आले आहे. या कामगारांची, खलाशांची माहिती पोलिसांकडे नसल्याने बऱ्याचदा तपासात अडचणी निर्माण होतात. यामुळे आता रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी याबाबत कडक पावले उचलली आहेत यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी एका बैठकीचे आयोजन केले होते आंबा बागायतदार आणि बोट मालक यांची संयुक्त बैठक आज (१० ऑगस्ट) रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत घेण्यात आली, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली. या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उप अधीक्षक राधिका फडके, पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांच्यासह आंबा बागायतदार आणि बोट मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच जिल्हाभरातील पोलीस ठाण्यातील पोलीस आणि दीड हजार नागरिक ऑनलाइन पद्धतीने या बैठकीत सहभागी झाले होते.