कार्यकर्त्यांच्या भवितव्यासाठी विधानसभा लढवणार, माजी आमदार सदानंद चव्हाण
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा भगवा, धनुष्यबाण या मतदारसंघात टिकवला पाहिजे, ही आमची भावना आहे. त्यामुळे आम्ही आमच्या भवितव्यासाठी लढत असून आता ही लढाई महत्वाची असल्याने मी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी मंगळवारी येथील शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात जाहीर केले आहे. याचवेळी उपस्थित शिवसैनिकांनी एकच निर्धार, सदानंद चव्हाण पुन्हा एकदा आमदार असा एल्गार पुष्कर सभागृह दणाणून सोडले.www.konkantoday.com