मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यातून कोकणात जाणाऱ्या नागरिकांची एसटीला पसंती

कोकणात गणेशोत्सवाचा एक वेगळाच उत्साह असतो. अशात मुंबई-पुण्यातून कोकणात जाणाऱ्या चाकरमानी दोन महिने आधीपासूनच तयारी करत असतात. रेल्वे प्रशासनाने कोकणात जाण्यासाठी जादा गाड्या सोडल्या आहेत. त्याचबरोबर, एसटी महामंडळानेही प्रवाशांसाठी 4 हजार गाड्या सोडल्या आहेत. मात्र अवघ्या काही दिवसांतच एसटीच्या 2 हजाराहून अधिक बस आरक्षित झाल्या आहेत. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. यंदा 7 सप्टेंबर रोजी गणपती येत आहेत. त्यापूर्वीच भाविक कोकणात जाण्याची लगबग करत असतात. प्रवाशांची ही लगबग पाहून एसटी आणि रेल्वे प्रशासनाने जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेनेही फेस्टिव्ह ट्रेन सोडल्या आहेत. तर, एसटीनेही जादा गाड्या सोडल्या आहेत. मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यातून कोकणात जाणाऱ्या नागरिकांनी एसटीला पसंती दिली आहे. त्यामुळं एसटीच्या 1,301 बसच्या गट आरक्षणासह एकूण 2,031 जादा बस आत्तापर्यंत पूर्ण आरक्षित झाल्या आहेतगणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा 2 ते 7 सप्टेंबर दरम्यान 4300 जादा एसटी बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना 50 टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे. २ सप्टेंबर पासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.यंदा एसटीतर्फे सुमारे ४,३०० जादा बस सोडण्यात येणार असून त्यापैकी २,०३१ बसचे पूर्ण आरक्षण झाले आहे. गणेशभक्तांसाठी विविध सुविधादेखील यंदा करण्यात आल्या आहेत.गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून २ ते ७ सप्टेंबर या काळात बस स्थानक व बस थांब्यांवर एसटीच्या वरिष्ठ अधिका-यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्रकार्यरत राहणार आहेत, तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथकदेखील तैनात करण्यात येणार आहेत.यंदा सुमारे 4,300 जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील. या बसेसचे आरक्षण npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. शिवाय बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation ॲपव्दारे उपलब्ध होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button