विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटात अंतर्गत कलह
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटातला अंतर्गत कलह समोर आलाय, मातोश्रीवरील चौकडी उद्धव ठाकरेंना भेटू देत नाही, असं म्हणत कुर्ला विभागप्रमुख महेश पेडणेकर यांच्यासह सर्व शाखाप्रमुखांनी राजीनामा दिलाय.तर पालघर जिल्हाप्रमुख राजेंद्र पाटील यांनीही राजीनामा दिलाय.मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला आणि पालघर विधानसभा क्षेत्रातील विभाग प्रमुख, जिल्हाप्रमुख, उपविभागप्रमुख ते सर्व शाखाप्रमुख आणि महिला संघटकांचे राजीनामे दिले आहेत. कुर्ला विधासनभेतील पदाधिकाऱ्यांचा रवी म्हात्रेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी अडथळे निर्माण करत असल्याचा म्हात्रेंवर आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.