रत्नागिरी तालुक्यातील परिवहन महामंडळाच्याबिघडलेल्या वेळापत्रकामुळे विद्यार्थी व नोकरदारांना त्रास मनसेचा आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेतर्फे परिवहन मंडळाच्या रत्नागिरी आगार व्यवस्थापकांची भेट घेत रत्नागिरी तालुक्यातील परिवहन महामंडळाच्याबिघडलेल्या वेळापत्रकामुळे विद्यार्थी, नोकरदार व कामगार वर्गाला सोसाव्या लागणाऱ्या त्रासाबद्धल नाराजी व्यक्त करण्यात आली.कुरतडे -चांदेराई-लाजूळ यासह ग्रामीण भागातील एकंदरित बिघडलेल्या सर्वच ठिकाणच्या वेळापत्रकामुळे होणाऱ्या गैरसोयीचा पाढा यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांकडून वाचण्यात आला.याबाबतीत बिघडलेल्या वेळापत्रकात लवकरात लवकर सुधारणा करून ग्रामीण भागातील विद्यार्थी, नोकरदार व कामगार वर्गाला होणाऱ्या त्रासाला आळा घालण्यात यावा अशी मागणी मनसे पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली.तसेच यानंतर सकारात्मक बदल न दिसल्यास मनसेकडून आक्रमक भूमिका घेतली जाईल असा ईशारा ही प्रशासनाला देण्यात आला.यावेळी मनसे राज्य परिवहन कामगार सेना उपाध्यक्ष सुनील साळवी, मनसे रत्नागिरी शहरअध्यक्ष अद्वैत कुलकर्णी, उपतालुकाध्यक्ष रूपेश चव्हाण, विभागअध्यक्ष दिलीप नागवेकर, विभागअध्यक्ष सर्वेश जाधव, विभागअध्यक्ष शैलेश मुकादम, विभागअध्यक्ष अखिल शाहू, शाखाध्यक्ष मार्विक नारकर आदि महाराष्ट्रसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.