योजनेतील जाचक अटींमुळे कोकणातील शेतकरी काजू अनुदानापासून वंचित राहणार?
केली असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र या योजनेतील जाचक अटींमुळे कोकणातील काजू उत्पादक शेतकर्यांना खरंच या योजनेचा लाभ होईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.जागतिक बाजारपेठेत काजूगराने आपले स्थान भक्कम केले आहे. त्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील काजूने तर चांगलेच वर्चस्व ठेवले आहे. यामध्ये काजूची असलेली चव होय. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत काजूगर प्रतिकिलो दीड ते दोन हजार रुपये दराने विकला जात आहे. काजूगराला खर्या अर्थाने चांगली बाजारपेठ मिळवून देण्यास कोकणातील काजूचा मोठा वाटा आहे.www.konkantoday.com