
खेडच्या समरीन बुरोंडकरची महाराष्ट्राच्या महिला कबड्डी संघात निवड
खेड येथील अनिकेत स्पोर्ट क्लब भरणेची सदस्य व रत्नागिरी जिल्हा महिला कबड्डी संघाची खेळाडू समरीन बुरोंडकर हिची महारष्ट्र राज्य कबड्डी संघामध्ये निवड झाली आहे. याबद्दल सपूर्ण तालुकावासियांसह जिल्ह्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने बिहार राज्य कबड्डी असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ११ व्या राष्ट्रीय बीच कबड्डी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संघात रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाची व खेड तालुक्यातील रहिवासी असणारी समरीन बुरोंडकर हिची निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा ९ ऑकस्ट ते ११ ऑगस्ट दरम्यान होणार असून या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचे दोन्ही संघ ६ ऑगस्ट रोजी मुंबई येथून बिहारकडे रवाना होणार आहेत. www.konkantoday.com