हल्ला करणारी तीनच पोरं होती, पोलिसांच्या बंदुकीत 24 गोळ्या होत्या,- जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया
_हल्ला करणारी तीनच पोरं होती, पोलिसांच्या बंदुकीत 24 गोळ्या होत्या, अशी पहिली प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हल्ला झाल्यानंतर दिलीयं.जितेंद्र आव्हाड यांनी संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांच्या विधानानंतर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांना आव्हाडांनी इशारा दिला होता. अखेर आज ठाण्यात आव्हाडांच्या गाडीवर झाला. या हल्ल्यानंतर आव्हाडांनी माध्यमांशी संवाद साधला.जितेंद्र आव्हाड म्हणाले, संभाजी महाराज ज्या विचारांचे आहेत त्या विचारांचा मी नाही. तुमच्या वडिलांनी तुमचा निषेध करणं म्हणजे तुम्हाला बेदखल करणं. हल्ला झाला तेव्हा मी पुढे बसलो होतो, गाडीवर काहीतरी पडल्याचा आवाज आला. त्यानंतर पुढे जाऊन आम्ही थांबलो मग हे उलटे फिरले, हे तीनच पोरं होती, पोलिसांकडे चार बंदुकी होत्या, त्यामध्ये 24 गोळ्या होत्या, या शब्दांत थेट इशाराच जितेंद्र आव्हाड यांनी दिलायं.लोकांनी माझ्या गाडीवर हल्ला केलायं, अशा भ्याड हल्ल्यांना मी घाबरत नाही. माझ्यावर हल्ला केलायं, म्हणून बोलणार नाही, असं नाही, आता तर मी आणखी क्लेषाने बोलणार असून आत्तापर्यंत मी खूप आदर करायचो पण आता नाही, तुम्ही जेव्हा अतिक्रमण तोडलं तिथं फक्त मुस्लिम राहत नाही तर हिंदूही राहतात ते गुण्यागोविंदाने राहतात. कोल्हापुरच्या पौराणिक मशीदीच्या बाहेर गणपतीची मुर्ती आहे ही सामाजिक एकता शाहू महाराजांनी जपली होती, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.