
चिपळूणचे शरीरसौष्ठवपटू सुहास भोसले यांचे निधन
चिपळूण शहरातील खेंड-कांगणेवाडी येथील मूळ रहिवासी तर सध्या बायपास येथे वास्तव्यास असणारे शरीसौष्ठवपटू सुहास संभाजी भोसले यांचे मंगळवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ३५ वर्षांचे होते. त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. सध्या ते एस. बी. फिटनेस जीम चालवत होते. त्यांच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.लहानपणापासूनच भोसले यांचा शरीरसौष्ठवकडे कल होता. त्यांनी अनेक शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. मनमिळावू शांत स्वभाव अशी त्यांची ओळख होती. गेल्या काही वर्षापासून ते शहरातील काविळतळी येथे एस. बी. फिटनेस ही जीम चालवत होते. दोन वर्षापूर्वी त्यांना किरकोळ आजारपण आले होते. त्यामुळे ते एका खाजगी रूग्णालयात उपचारासाठी गेले. मात्र अधिकच अस्वस्थ वाटू लागल्याने ते कराड येथे गेले. तेचे उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.www.konkantoday.com