सोनुर्ली-रोणापाल सीमेवरील जंगलात लोखंडी साखळी बांधलेल्या अवस्थेत एक अमेरिकन महिलेच्या तपासाबाबत पोलिसांची पथके रवाना

_सावंतवाडीमधील सोनुर्ली-रोणापाल सीमेवरील जंगलात लोखंडी साखळी बांधलेल्या अवस्थेत एक अमेरिकन महिला आढळली होती. तामिळनाडूमध्ये राहत असलेली महिला जंगलात कशी सापडली? असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.गुराख्याला महिला तिथे बांधलेल्या अवस्थेत सापडली होती. पोलिसही त्या ठिकाणी पोहोचले पण पीडित महिला अशक्त असल्याने तिला काही बोलता येत नव्हतं. पोलिसांनी तिने एका कागदावर इंग्रजीमध्ये लिहित तिच्यासोबत काय घडलं याची माहिती दिली. या पीडित महिलेचं नाव ललिता कायी कुमार एस असं आहे. अमेरिकन दुतावासाकडून घटनेची दखल घेतली गेली असून आता या प्रकरणाचा सायबर सेल तपास करणार आहे.विदेशी महिला ललिता कायी कुमार एस हिला जबर मानसिक धक्का बसला आहे. त्यामुळे तिला सावंतवाडी आणि बांदा पोलिसांनी या महिलेला ग्रामस्थांच्या मदतीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. गेले काही दिवस ती उपाशी होती. यानंतर उपचारानंतर गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले आहे. तर या घटनेच्या तपासासाठी तामिळनाडू, गोवा, मुंबई येथे पोलिसांच्या टीम पाठविण्यात आल्या आहेत. त्यांनी दिल्ली, बंगलोर येथे कार घेतल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. असे जिल्हा पोलीस अधीक्षक सौरमकुमार अग्रवाल यांनी स्पष्ट केले.ललिता कायी कुमार एस हिच्याकडे सापडलेला मोबाईल आणि टॅब त्यातील माहिती मिळण्यासाठी सायबर विभागाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रकरणात अमेरिकन दुतावासाने जलदगतीने तपास करण्याची विनंती भारत सरकारला केल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत. या प्रकरणी महत्वाचा पुरावा ठरणारे मडुरा रेल्वेस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असून असून त्यात ती कुठेही आढळून न आल्याने प्रकरणात गूढ वाढले आहे. जर तिला मडुरा स्थानकातून जंगलात आणले नसेल तर नेमके कुठून आणले? याचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. तर याच स्थानकातील अन्य सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू असल्याचे समजते. तिच्यासोबत असलेल्या मोबाईलवरूनतिने कोणाशी संपर्क केला? हे तपासणीअंती समोर येणार आहे.अमेरिकन महिलेच्या सुरुवातीच्या जबाबावरून तिच्या पतीविरोधात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकरणी तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल झाल्याने पतीला ताब्यात घेण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button