कोंकण रेल्वे कडून गणपति स्पेशल आणखी तीन गाड्या आरक्षित तिकिटे पदरात पाडण्यासाठी तिकिट खिडक्यांवर प्रवाशांची एकच झुंबड उडणार
कोकण रेल्वे मार्गावर पश्चिम रेल्वेच्या चार गणपती स्पेशलच्या २४ फेर्या जाहीर झालेल्या असतानाच असतानाच आणखी तीन गणपती स्पेशलही धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने गुरूवारी सायंकाळी जाहीर केले. यात बांद्रा-कुडाळ, अहमदाबाद-कुडाळ, विश्वमेत्री-कुडाळ स्पेशलचा समावेश आहे. तीनही स्पेशल गाड्यांचे आरक्षण २८ जुलैपासून खुले होणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. वसईमार्गे धावणार्या फेर्यांमुळे बोरिवली, विरार, वसईस्थित गणेशभक्तांसाठी सोयीचे होणार आहे.कोकण मार्गावर गणेशोत्सवात धावणार्या सहा गणपती स्पेशल गाड्यांच्या १६६ फेर्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाल्याने प्रवाशांना गाव गाठण्यााची चिंता सतावत होती. पश्चिम रेल्वेनेही चाकरमान्यांच्या दिमदीला धावत चार गणपती स्पेशलच्या फेर्या जाहीर करत सुखद धक्का दिलेला असताच आणखी तीन गणपती स्पेशल फेर्या जाहीर केल्या आहेत. या तीनही स्पेशल गाड्यांचे रविवारी आरक्षण खुले होणार आहे. आरक्षित तिकिटे पदरात पाडण्यासाठी तिकिट खिडक्यांवर प्रवाशांची एकच झुंबड उडणार आहे. www.konkantoday.com