अटल सेतूवरून खवळलेल्या समुद्रात उडी मारून बेपत्ता झालेला तरुण डोंबिवली चा इंजिनियर
काल अटल सेतूवरून खवळलेल्या समुद्रात उडी मारून बेपत्ता झालेल्या तरुणाची ओळख आता पटली आहेएका इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरने अटल सेतूवरून खवळलेल्या समुद्रात उडी घेतल्याची घटना घडली आहे.ही घटना मंगळवारी (२४ जुलै) दुपारच्या सुमारास घडली. श्रीनिवास कुरुकुट्टी (३८) असे या बेपत्ता तरुणाचे नाव असून त्याचा समुद्रात सर्वत्र शोध घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार श्रीनिवास डोंबिवलीत रहात असून कुवैतमध्ये नोकरीला होते. वैफल्यातून त्यांनी हे पाऊल उचलले आहे. मुंबईकडून सुमारे साडे १३ किलोमीटरच्या अंतरावर ही घटना घडली.ही घटना मंगळवारी (२४ जुलै) दुपारच्या सुमारास घडली. श्रीनिवास कुरुकुट्टी (३८) असे या बेपत्ता तरुणाचे नाव असून त्याचा समुद्रात सर्वत्र शोध घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार श्रीनिवास डोंबिवलीत रहात असून कुवैतमध्ये नोकरीला होते. वैफल्यातून त्यांनी हे पाऊल उचलले आहे. मुंबईकडून सुमारे साडे १३ किलोमीटरच्या अंतरावर ही घटना घडली.कारमधून उतरून समुद्रात उडी मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून दिसते की, हा व्यक्ती रसत्यात कार थांबवून खाली उतरतो व कारचा दरवाजा बंद करून पुलाच्या कठड्यावरून खाली समुद्रात उडी मारतो.श्रीनिवास कुरुकुट्टी कुवैत येथील एका खासगी कंपनीत नोकरीला होते. मात्र गेल्या ऑक्टोबरमध्ये ते जॉब सोडून डोंबिवलीतच आपला स्वतःचा व्यवसाय करत होते. मात्र आर्थिक अडचणींमुळे ते तनावात होते. मंगळवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास ते चारचाकी गाडीतून अटलसेतुवर आले व सेतूवरुन थेट खवळलेल्या समुद्रात उडी घेतली. ते बेपत्ता झाले असून त्यांचा शोध घेतला जात आहे. याआधी कुवैतमध्येही त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.चार मच्छिमार बोटी, सागरी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने त्यांचा समुद्रात शोध घेतला जात आहे