रत्नागिरी डाकघर येथे गुरुवारी वित्तीय समायोजन मेळावा

रत्नागिरी, दि. 24 (जिमाका) : डाक विभाग, रत्नागिरीवतीने 25 जुलै रोजी रत्नागिरी हेड पोस्ट ऑफीस, गाडीतळ येथे सकाळी 10 ते सायंकाळी 6 वा. या वेळेत वित्तीय समायोजन मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाक विभागामार्फत करण्यात येत आहे.*ग्रामीण डाक विमा, डाक विमा, इंडिया पोस्ट पेमेंट बँकाच्या सर्व सुविधा, जन सुरक्षा योजना, प्रधानमंत्री किसान योजना खाती, माझी लाडकी बहीण योजना खाती, महिला सन्मान योजना खाती, पोस्ट ऑफीसच्या विविध योजनांची खाती, लहान मुलांचे आधारकार्ड काढणे, अपडेट करणे, आधार कॅम्पमध्ये आधार वरील नाव बदलणे, पत्ता बदलणे, फोटो बदलणे, मोबाईल नंबर लिंक करणे आदी योजनांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी घेता येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button