बांधकाम कामगारांना सुरक्षा संच, गृहपयोगी वस्तु विनामुल्य कामगारांनी कोणताही प्रकारचा आर्थिक व्यवहार करु नये रत्नागिरी, दि. 24 (जिमाका): बांधकाम कामगारांना सुरक्षा संच, अत्यावश्यक संच व गृह उपयोगी वस्तूसंच विनामुल्य आहेत. काही कामगार हे एजंट किंवा संघटना यांच्याशी आर्थिक व्यवहार करताना दिसून येत असून, कामगारानी कोणत्याही व्यक्ती, एजंट किंवा संघटना यांच्याशी कोणताही प्रकारचा आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्तांनी केले आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत जिल्ह्यातील नोंदीत जिवीत (सक्रिय) बांधकाम कामगारांना सुरक्षा संच, अत्यावश्यक संच व गृह उपयोगी वस्तूसंच (भांडी वाटप) यांचे वाटप करण्यात येते.संचाचे वाटप करण्यासाठी मे. माफतलाल इंडस्ट्रिज लि. या कंपनीची शासनामार्फत नियुक्ती करण्यात आली असून संचाचे वाटप करताना संच हे विनामूल्य आहे याची नोंद घ्यावी. काही कामगार हे एजंट किंवा संघटना यांच्याशी आर्थिक व्यवहार करताना दिसून येत आहेत. कामगारानी कोणत्याही व्यक्ती, एजंट किंवा संघटना यांच्याशी कोणताही प्रकारचा आर्थिक व्यवहार करू नये. जर अशा आर्थिक व्यवहारातून फसवणूक झाल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. तरी अशा फसवणूकी बाबत तक्रार आल्यास नजीकच्या पोलीस स्थानकाशी संपर्क करून तक्रार दाखल करण्यात यावी.000