
राजापूर रेल्वे स्थानकात रिक्षाचालकांकडून प्रवासी भाडे मिळविण्यासाठी झुंबड.
राजापूर रोड रेल्वेस्थानकात उतरलेल्या प्रवाशांकडून आपल्यालाच प्रवासी भाडे मिळावे म्हणून प्रवेशद्वारावरच वाहनधारकांकडून झुंबड केली जात असताना आता तरी प्रवासी भाडे मिळावे म्हणून काही चारचाकी चालक व रिक्षा व्यावसायिक चक्क फलाटावर बेकायदेशीरपणे जास्त प्रवाशांची मनधरणी करीत आहेत. यामध्ये स्पर्धा लागलेली दिसून येत आहे.कोकण रेल्वेने आलेल्या प्रवाशांना राजापूर रोड रेल्वेस्थाकांत असलेल्या काही रिक्षा व्यावसायिक व खाजगी वाहनधारकांमधून भाडे अवाच्या सव्वा आकारण्यात येत असल्याचे सर्वश्रृत असताना आता तर भाडे मिळावे म्हणून बॅग ओढण्याचे प्रकार सुरू केले आहेत. राजापूर रोड रेल्वेस्टेशनला स्वतंत्र रिक्षा स्टँड असतानाही काही रिक्षा व्यावसायिक व खाजगी वाहनधारक स्टेशन परिसरात बेशिस्तपणे आपली वाहने उभी करून ठेवीत भाडे मिळावे म्हणून फलाटावरून येणार्या जीन्यावरच (प्रवेशद्वारावरच) गर्दी करीत प्रवाशांचे सामान ओढण्याचे प्रकार होत आहेत. www.konkantoday.com