महा-ईसेवा केंद्र व सेतू मधील नागरिकांची गैरसोय कमी होण्यासाठी त्वरित उपाय योजना व्हाव्यात-सतेज नलावडे
शासनाकडून विविध लोक कल्याणकारी योजना मंजूर करण्यात आल्या असून त्याची कागदपत्रे पूर्ण करणे व शाळेचे विविध दाखल्यांसाठी सेतू व तहसील कार्यालय मधे गर्दी होत आहे.हया गर्दीवर उपाययोजना कराव्यात यासाठी श्री.लिलाधर भडकमकर(प्रदेश सचिव,भाजपा कामगार आघाडी),श्री.सतेज नलावडे(जिल्हा सरचिटणीस,भाजपा रत्नागिरी दक्षिण),श्री.दीपक आपटे व इतर यांनी मा.उपजिल्हाधिकारी सौ.शुभांगी साठे यांची भेट घेतली.यावेळी प्रशासनाला विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या यामध्ये.१)सेतू मधील विविध कोरे फॉर्म ग्रामपंचायत मधे उपलब्ध करण्यात यावे.२)परिपूर्ण फॉर्म ग्रामपंचायतीमध्ये भरून घेऊन सेतू मधे जमा करून संबंधित प्राप्त दाखले परत ग्रामपंचायतीमध्ये द्यावेत.३)जिल्ह्यातील ७६५ पैकी ४६६ ईसेवा केंद्र बंद असून बंद असलेली किव्हा कार्यरत नसलेली केंद्र त्वरित इतराना वितरित करण्यात यावीत.४) तहसील कार्यालयात कामानिमित्त आलेल्याना निदान बसण्यासाठी खुर्च्या व स्वच्छ पाण्याची सोय करण्यात यावी. वरील वस्तुस्थिती मा.मंत्री रवींद्र चव्हाण साहेबांच्या कानावर घालण्यात येणार असून वरील अडचणींवर उपाय योजना करण्याचे मा.उपजिल्हाधिकारी व मा.तहसीलदार यांनी ग्वाही दिली.