
रत्नागिरी जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागांवर स्थानिक मानधनावर शिक्षकांची नियुक्ती करण्याची संघटनेची मागणी
रत्नागिरी जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागांवर स्थानिक मानधनावर शिक्षकांची नियुक्ती करा, अशी मागणी डीएड, बीएड बेरोजगार संघटनेने केली आहे.तसे झाले नाहीतर आंदोलन करू अशा इशाराही दिला आहे.रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक विभागात नव्याने शिक्षक भरती होऊनही सुमारे नऊशेहून अधिक जागा रिक्त आहेत. मागील शैक्षणिक वर्षात मानधनावर रिक्त जागा भरल्या आहेत. शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर सर्व स्थानिकांना नवीन भरती झाल्यामुळे कार्यमुक्त करण्यात आले. नवीन शिक्षक भरती होऊनही मोठ्याप्रमाणात जागा रिक्त आहेत. स्थानिक मानधनावरील शिक्षक पुनर्नियुक्तीसाठी वारंवार पाठपुरावा करत असून शासन अनुत्सुक आहे. शासनाची डिएड, बीएड धारकांबद्दल आस्था नाही. अनेक पदवीधर बेकार आहेत.