रेल्वे रूळांच्या चाव्यांची चोरी करणाऱ्या संशयित महिलांना जामीन मंजूर
कोकण रेल्वे मार्गावरील रूळावर असणार्या लोखंडी चाव्यांची चोरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन महिलांची २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता करण्यात आली. भारती गोविंद पड्यार (३८, रा. दाभोळे, ता. संगमेश्वर) व लक्ष्मीबाई बासुराज आडेकर (४०, रा. लांजा) असे या महिलांचे नाव आहे. चोरीप्रकरणी ग्रामीण पोलिसांकडून त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली होती. www.konkantoday.com