खेडमध्ये मुसळधार पाऊस जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली शहराला पुन्हा पुराचा धोका
*गेले काही दिवस रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले आहे खेड परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहेखेड तालुक्यातील विविध भागात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे खेड शहरांमध्ये पुन्हा परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्याने मुसळधार पावसामुळे खेड दापोली मार्ग बंद झाला आहे खेड बाजारपेठेतही पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे सर्वांनी सतर्क राहून प्रशासन व खेड येथील पूर प्रवण क्षेत्रात राहणाऱ्या सर्व नागरिकांना व व्यापारी वर्गास सहकार्य करावा असे आवाहन करण्यात आला असून खेड नगरपरिषद प्रशासन अलर्ट मोडवर आहे