आता शिवसेनेने व्यवहारी भूमिका घेत राजकारण केले पाहिजे, बाहेरील कोणाला उमेदवार देण्यापेक्षा शिवसैनिकांनाच उमेदवारी दिली पाहिजे,- भास्कर जाधव यांचा नेतृत्वाला सल्ला
गद्दारांना धडा शिकवण्यासाठी दुसऱ्या पक्षाच्या उमेदवारांना मोठे करण्याची भूमिका लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेनेने घेतली. आता शिवसेनेने व्यवहारी भूमिका घेत राजकारण केले पाहिजे. बाहेरील कोणाला उमेदवार देण्यापेक्षा शिवसैनिकांनाच उमेदवारी दिली पाहिजे, असे मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय नेते आमदार भास्कर जाधव यांनी रविवारी केले.आमदार जाधव पुढे म्हणाले, होवू दे चर्चा यातून चांगला फायदा शिवसेनेला झाला. हे लोकसभेच्या निवडणूकीच्या निकालातून दिसले.उद्धव साहेब ज्या पक्षासोबत आहेत त्याठिकाणी जास्त जागा निवडून येतात.गद्दारी करणा-या भाजपला छोट करण्यासाठी शिवसैनिकांनी मोठ झाले पाहिजे.जो कोणी शिवसेनेशी गद्दारी करेल,विश्वासघात करेल त्याला धडा शिकवायची भुमिका आपण ठेवली पाहिजे. येत्या विधानसभा निवडणूकीत उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना निवडणून आणूया. उध्दव ठाकरे आजारी असताना त्याचा फायदा घेत भाजपने त्यांच्या पाठीत वार केला.त्यांना महाराष्ट्राच्या गादीवरून तडीपार करूया. त्यांची घमेंड या विधानसभा निवडणूकीत उतरवा. देशाच्या संविधानावरील संकट संपलेले नाही,भाजपलाडाव शिल्लक आहे. राज्या -राज्यातील सत्ता जर त्यांच्या हातात दिल्या तर विधीमंडळात ठराव करून ते संविधानात बदल करू शकतात. भाजप आम्हाला हिंदूत्व सोडले म्हणत असेल तर विधानपरिषदेच्या निवडणूकीत एमआयएमची ची दोन मतं कोणाला पडली..याचे उत्तर भाजपने द्यावे. म्हणजे तुम्हीच खरे जातीयवादी आहात असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. गटबाजी संघर्ष आपआपसात करत बसू नका संघर्ष विरोधकांशी करा आपल्यात नको असा सल्लाही त्यांनी शिवसैनिक पदाधिका-यांना दिला.