दरवर्षी २५ जून रोजी संविधान हत्या दिन, केंद्र शासनाचा निर्णय
यापुढे दरवर्षी २५ जून हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून पाळण्यात येईल, अशी घोषणा केंद्र सरकारने केली आहे. या दिवशी १९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. त्यांच्या या कृतीमुळे लोकांच्या सर्व घटनात्मक अधिकारांचा भंग झाला होता. आणीबाणी हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील काळा अध्याय आहे. त्यामुळे हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून पाळला जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.www.konkantoday.com