खड्डे व खडी पसरल्याने रत्नागिरीतील रस्ते दिवसेंदिवस ठरत आहेत दुचाकीस्वारांसाठी धोकादायक
रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर सर्कल पासून शहरातील खालच्या भागापर्यंत असणारे रस्ते धोकादायक झाले आहेत रत्नागिरी शहरातील सिमेंट काँक्रीट करण्याचे काम सुरू झाल्यानंतर रस्त्याच्या खाली लेवल करण्यासाठी डांबरीकरण करण्यात आले त्यानंतर त्याच्यावर काँक्रीटचे रस्ते घालण्यात आले मात्र मारुती मंदिर पासून खाली जयस्तंभ पर्यंत काँक्रिटीकरणाचे काम पावसापूर्वी करणे शक्य नसताना देखील त्या ठिकाणी घाईघाईने हलक्या दर्जाचे डांबरीकरण करण्यात आले पाऊस सुरू होतास या डांबरीकरणाची खडी रस्त्यावर पसरली असून या ठिकाणाहून दुचाकी व इतर वाहने चालवणे धोकादायक बनले आहे संपूर्णपणे ही खडी रस्त्यावर आल्याने वाहने व दुचाकी सरकण्याची भीती निर्माण झाली आहे त्यातच अनेक भागात खड्डे पडले असून या रस्त्यावरून दुचाकी चालवणे धोकादायक झाले आहे उघाडी पडताच खड्डे बुजवले जातील असे नगरपरिषदेकडून आश्वासन देण्यात आले होते प्रत्यक्षात दोन दिवस उघाडी असूनही नगरपरिषदेने रस्त्यावरील खडी बाजूला घेण्यासाठी कोणतीही पावले न उचलता त्याकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे नागरिकांच्या संतापाचे वातावरण आहे विशेष म्हणजे इतर राजकीय पक्ष केवळ मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यावर समाधान मानत आहेत या प्रश्नावरून नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाला कडक जाब विचारणे आवश्यक आहे