पुरावा दाखवा अन्यथा राजकीत संन्यास घ्यावा- आमदार राजन साळवी यांचे थेट पालक मंत्र्यांना आव्हान
* कोकणात आता ठाकरे गटाचे नेते राजन साळवी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत आमने सामने आले आहेत. राजापूर तालुक्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी थेट उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांना राजकीय संन्यास घेण्याचं आव्हान दिलं आहे.राजापूर तालुक्यातील वाटुळ या गावी मुंबई गोवा हायवे लगत सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलची उभारणी केली जाणार आहे. दरम्यान या हॉस्पिटलची उभारणी होण्यासाठी सुरुवातीला लागणारा काही निधी उपलब्ध करून देत असल्याचे उदय सामंत यांनी म्हटलं. त्यानंतर राजन साळवी यांनी उदय सामंत यांना थेट आव्हान दिलं आहे. राजन साळवी म्हणाले, रुग्णालयाच्या उभारणीसाठी पाठपुरावा केल्याचं उदय सामंत यांनी सिद्ध करावं अन्यथा राजकीत संन्यास घ्यावा, मी पाठपुरावा केल्याचं सिद्ध न केल्यास मी स्वतः राजकीय संन्यास घेईन. सामंत यांच्या मतदार संघातील जिल्हा रुग्णालयाच्या दुरावस्तेकडे सामंत यांनी लक्ष द्यावं. रुग्णालयासाठी लागणारी जमीन मिळवण्यापासून ते मंजुरीपर्यंत पाठपुरावा केल्याचं मी कागदपत्रांसह सिद्ध करेन, अन्यथा राजकीय संन्यास घेईन. पुढे बोलताना राजन साळवी म्हणाले, राजापूर – लांजा – साखरपा या विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून या रुग्णालयासाठी मी पाठपुरावा केला. त्याची कागदपत्र देखील माझ्याकडे उपलब्ध आहेत. पण असं असताना देखील उदय सामंत त्याचं श्रेय घेऊ पाहत आहेत. त्यांचे थोरले बंधू किरण सामंत यांनी पाठपुरावा केल्याचं सांगत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रयत्न केल्याचं देखील म्हणणं उदय सामंत यांचा आहे. पण उदय सामंत यांनी या रुग्णालयासाठी पाठपुरावा केल्याचं सिद्ध करावं. या रुग्णालयाच्या उभारणीसाठी आणि जमीन मिळवण्यासाठी मी पाठपुरावा केल्याचे कागदपत्र माझ्याकडे उपलब्ध आहेत. त्यांनी हे सिद्ध न केल्यास राजकीय संन्यास घ्यावा अन्यथा मी राजकीय संन्यास घेईन असं थेट आव्हान साळवी यांनी उदय सामंत यांना दिले आहे