साखरप्यात आणखी एक बिबट्या उपटला मध्यरात्री हॉटेलमध्ये शिरून केली कुत्र्याची शिकार ,पहा व्हिडिओ
साखरप्यामध्ये मध्ये काही दिवसांपूर्वीच दोन जणांवर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रकार घडला होता त्यानंतर हा बिबट्या शेजारच्या घरात मृत अवस्थेत सापडला होता त्यामुळे साखरपावासीय बिबट्यापासून भयमुक्त झाले म्हणत असतानाच आता साखरप्यात नवा बिबट्या उपटला आहे या बिबट्याने मध्यरात्री एका बंद हॉटेलमध्ये शिरून मोठा थरार निर्माण केला संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथील एका हाँटेलमध्ये मध्यरात्री बिबट्या शिरला. या बिबट्याने टेबलजवळ बसलेल्या कुत्र्याला जबड्यात पकडून अलगद बाहेर उचलून नेले. या घटनेचे सीसीटिव्ही फुटेज सध्या व्हायरल झाले आहे. टेबलच्या बाजूला एक कुत्रा झोपला होता. दबक्या पावलाने आलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली आणि त्याला तोंडात धरून बिबट्या बाहेर निघून गेला. साखरपा येथील एका हाँटेलमध्ये शिरून कुत्र्याला उचलून नेल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यामुळे उघड झाली आणि त्याची चर्चा दिवसभर सोशल मीडियावर सुरू झाली आहे.दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वनपाल तौफीक मुल्ला यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी जावून पाहणी केली. नागरिकांनी आपली पाळीव कुत्री सुरक्षीत ठिकाणी ठेवावी, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. काही दिवसांपूर्वी बिबट्याने हल्ला केल्याच्या दोन घटना साखरपा भागात घडल्या आहेत. त्यामुळे या परिसरात आता बिबट्याचे अस्तित्व कायम असल्याचे सिद्ध झाले आहे