मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण देवरुख, लांजा, चिपळूण, गुहागर, खेड येथील कार्यक्रमबाबत नियोजन करावे -जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह
* रत्नागिरी, : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेच्या अनुषंगाने 13 जुलै रोजी देवरुख व लांजा, 14 जुलै रोजी चिपळूण व गुहागर आणि 15 जुलै रोजी खेड येथे कार्यक्रम करण्याबाबत नियोजन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे, मुख्याधिकारी तुषार बाबर, तहसिलदार राजाराम म्हात्रे आदी उपस्थित होते जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, आपल्या तालुक्यातील उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी यांनी नियोजन करावे. ग्रामपंचायत तसेच शहरांमध्ये योजनेच्या प्रसिध्दीसंदर्भात पोस्टर्स, बॅनर लावावेत. रत्नागिरी येथे ज्या पध्दतीने पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शुभारंभाचा कार्यक्रम झाला त्याच धर्तीवर कार्यक्रमाचे नियोजन करावे. त्या कार्यक्रमासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रित करावे, असेही ते म्हणाले.000