महिलेवर खुनी हल्ला केलेप्रकरणी आरोपी मंगेश मधुकर चौगुले याला दहा वर्षाची सक्त मजुरी
महिलेवर खुनाचा प्रयत्न केलेप्रकरणी आरोपी मंगेश मधुकर चौगुले, रा. टाळसुरे, ता. दापोली, जि. रत्नागिरी यांस येथील अति सत्र न्यायालय-१ खेड चे न्यायाधीश श्री. डॉ सुधीर एम. देशपांडे, यांनी दोषी ठरवत .१० वर्ष सश्रम कारावास आणि रुपये ६०,हजार रुपये इतका दंडाची शिक्षा ठोठावली, मौजे टाळसुरे ता. दापोली, जि.रत्नागिरी येथील पिडीता हिचे नव-याचे मावस भाउ असलेला आरोपी मंगेश मधुकर चोगुले हा पिडीतेला वारंवार त्रास देवुन तिची मानसिक छळवणुक करीत होता. आरोपी पिडीतेस सतत फोन करत असे आणि तिने फोन उचलला नाही या रागातुन आरोपी याने २५ जानेवारी २०१७ रोजी पिडीता तिचे घरातील पडवीमध्ये भांडी घासत असताना तिचे गळयावर घरात घुसुन ठार मारणेचे इरादयाने चाकुने वार करून पिडीतेस जखमी केले, आणि फरार झाला. सदर आरोपी ७ महिन्यानंतरपकडला जावुन दीड वर्षे न्यायालयीन कोठडीत होता. त्यानंतर सदर केस चालून आणि पिडीतेचा जवाब विचारात घेवून आणि तिचेवर घडलेल्या प्रसंगाची गंभीरता पुराव्यासह शाबीत झालेवर कोर्टाने याकामी आरोपीस दोषी धरले आणि त्यास शिक्षा ठोठावणेत आली. सदर प्रकरणी सरकार पक्षातर्फे एकुण १४ साक्षीदार तपासणेत आले. आणि परिस्थितीजन्य पुरावा कोर्टासमोर मांडणेत आला.या प्रकरणी सरकारी वकील अॅड. सौ. मृणाल जाडकर यांनी सरकार पक्षाच्या बाजुने, युक्तीवाद करुन संपुर्ण केसचे कामकाज पाहिले.