
ऑनलाईन गेम्स, सट्टा हा राष्ट्रासाठी मोठा धोका, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कोकण प्रांत सचिव मानसिंग यादव
ऑनलाईन गेम, सट्टा हा व्यक्ती, कुटुंब, समाज आणि राष्ट्रासाठी धोका आले. या प्रकाराने भारतातील तरूणाईला वेड लावलं असून हा व्यवसाय दिवसेंदिवस वाढू लागला आहे. त्यामुळे वेळीच सावध व्हायला हवे. अन्यथा हे संकट अंमली पदार्थांच्या व्यसनापेक्षाही भीषण रूप धारण करू शकते, अशी भीती अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कोकण प्रांत सचिव मानसिंग यादव यांनी व्यक्त केले.अखिल भारतीय ग्राहक पंचायत हा धोका टळण्यासाठी भिंतीप्रमाणे मध्यभागी दुभाजक म्हणून उभी आहे. ऑनलाईन जुगार आणि सट्टेबाजीचा प्रकार आणि जाहिरात करणार्या युथ, आयकॉन्सना पत्र लिहून त्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. ज्या सेलिब्रेटींना पत्रे लिहिली गेली आहेत, त्यात महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि स्मृती मानधना हे क्रीडा जगतातील आहेत. तर चित्रपट जगतातील हृतिक रोशन आणि शाहरूख खान यांचा समावेश आहे. याशिवाय सरकारने नियामक कायदा करण्यासाठी केंद्रीय कायदा मंत्री, अर्थमंत्री आणि मा. ना. प्रल्हाद जोशी, अन्न ग्राहक मंत्री यांना विनंती पत्रही पाठविले आहे. समाजाचीही भूमिका महत्वाची असल्याने त्यातून अपेक्षा करणे मारक ठरेल आणि कायदा फारसा प्रभावी ठरणार नाही. त्यामुळे समाजाने जागरूक होवून सोसायटी सदस्यांचे लक्ष वेधून घेणे आवश्यक आहे.www.konkantoday.com