अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात एसटीच्या ४०५ फेर्या रद्द, मंगळवारी ही फेर्या रद्द
रत्नागिरी जिल्ह्यात होणार्या अतिवृष्टीमुळे सोमवारी एसटीच्या ४०५ फेर्या रद्द करण्यात आल्या. यामध्ये सर्वाधिक ९२ फेर्या या चिपळुणातील आहेत. तर त्यानंतर राजापूरमधील ७१ फेर्या रद्द करण्यात आल्या, अशी माहिती रत्नागिरी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली. पावसामुळे रद्द करण्यात आलेल्या बसमुळे एसटीला मोठा आर्थिक फटका बसला. तसेच प्रवाशांनाही एसटी ऐवजी खाजगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागला.ग्रामीण भागातील प्रवाशांना व शाळकरी विद्यार्थ्यांना प्रवासासाठी एसटी बस उपयुक्त ठरत असते. सोमवारी प्रशासनाकडून अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर एसटी प्रशासनाकडूनही दक्षता बाळगण्यात आली. सोमवारी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याने एसटी फेर्या रद्द करण्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला नाही, असे असले तरी दररोज उदरनिर्वाहासाठी एसटीने प्रवास करणार्यांना मात्र त्रासाला सामोरे जावे लागले. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने त्या ठिकाणीही बसफेर्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. मंगळवारी ही शाळांना सुट्टी असल्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्याwww.konkantoday.com