गुहागरात होतेय वनविभाग कार्यालया समोरूनच शृंगारतळीत खुलेआम लाकूड वाहतूक
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथून खुलेआम ट्रकद्वारे लाकूड वाहतूक होताना दिसत आहे. शृंगारतळीतील वनविभागाच्या कार्यालयासमोरूनच ही वाहतूक होत असली तरी यावर वनविभागाकडून अंकुश ठेवला जात नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.एकीकडे कृषीदिनानिमित्त वृक्ष लागवड व संवर्धनाचे कार्यक्रम होत असताना दुसर्या बाजूला खुलेआम होणार्या लाकूड वाहतुकीवर निर्बंध लादले जात नसल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. वृक्षतोडीच्या लाकडांची खुलेआम ट्रॅक्टरद्वारे वाहतूक सुरू असल्याचे दृष्य शृंगारतळी-चिखली रस्त्यावर पहावयास मिळत आहे. www.konkantoday.com